• shivsevak96k@gmail.com
  • 9503579696
  • ४६ , मजरेवाडी , होटगी रोड , दक्षिण सोलापूर , जिल्हा सोलापूर - ४१३२२४
मुखपृष्ठ मेन्यू नोंदणी संपर्क
PROGRAM DETAILS

कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामविकास

"शेतकरी सुखी, रयत सुखी; रयत सुखी तर राज्य समृद्ध"

Home / Programs / कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामविकास
कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामविकास
OVERVIEW & OBJECTIVES

About This Welfare Initiative

"शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या समृद्धीचा शिल्पकार आहे."

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी करताना शेतकरी आणि रयतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांनी आपल्या सैन्याला स्पष्ट आदेश दिला होता की, "रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका," कारण शेतकऱ्याचा घाम म्हणजे स्वराज्याच्या वैभवाचा पाया. "शेतकरी सुखी, रयत सुखी; रयत सुखी तर राज्य समृद्ध" हीच त्यांच्या लोकाभिमुख शासनव्यवस्थेची अमर जीवनदृष्टी होती.

आजचा शेतकरी वाढता उत्पादन खर्च, अवास्तव बियाणे व खतांचे दर, अपुरा पीकविमा, कर्जबाजारीपणा, हवामानातील अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती आणि बाजारपेठेतील अन्यायकारक व्यवस्थेमुळे अभूतपूर्व संकटांना सामोरा जात आहे. अन्नदाता संकटात असेल तर राष्ट्राची प्रगतीही अपूर्ण राहते.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान हे संस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कृषी तत्त्वज्ञानाला आधुनिक काळात कृतीत उतरविण्याचा संकल्प करते. शेतकरी हक्कांचे संरक्षण, न्याय कृषी धोरणांसाठी जनआंदोलन, आधुनिक व शाश्वत शेतीचा प्रसार, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण, कृषी शिक्षण, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या स्वाभिमानाचे रक्षण हेच आमच्या कार्याचे केंद्रबिंदू आहेत.

अन्नदात्याचा सन्मान, शेतकऱ्याचा स्वाभिमान आणि समृद्ध, आत्मनिर्भर भारताची निर्मिती याच ध्येयाने आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कारण शेतकऱ्याच्या हातात नांगर मजबूत असेल, तर राष्ट्राच्या भविष्याची पायाभरणीही तितकीच भक्कम असेल.
Verified Community Impact
Thousands of lives touched across 36 districts
Targeted Execution

Programs are executed at the grassroots level by verified District Coordinators across Maharashtra.

80G Tax Deductible

All financial contributions for this program receive instant 80G tax exemption certificates.

Volunteer Driven

Powered by 12,000+ dedicated volunteers working with zero administrative overhead.