• shivsevak96k@gmail.com
  • 9503579696
  • ४६ , मजरेवाडी , होटगी रोड , दक्षिण सोलापूर , जिल्हा सोलापूर - ४१३२२४
मुखपृष्ठ मेन्यू नोंदणी संपर्क
संस्थेचा आधारस्तंभ

" शिवविचारांची प्रेरणा, राष्ट्रसेवेची साधना "

" श्रीमंत शहाजीराजांची दूरदृष्टी, राजमाता जिजाऊंचे संस्कार, शिवरायांचे सुशासन, धर्मवीर संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, रयतेची सेवा आणि राष्ट्रहिताचा अखंड ध्यास - हीच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानची प्रेरणा, ओळख आणि संकल्प."

Home / About Us
संस्थेची संकल्पना

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान

"शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान" हा केवळ सामाजिक संस्था नसून, हिंदवी स्वराज्याच्या लोककल्याणकारी विचारांना आधुनिक काळात कृतीरूप देणारा राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि जनसहभागाचा परिवार आहे.

भारतीय इतिहासात हिंदवी स्वराज्याने न्याय, स्वाभिमान, सुशासन, लोककल्याण, धर्मनिष्ठा, स्त्रीसन्मान, शेतकरी संरक्षण, संस्कृतीचे जतन आणि राष्ट्रहित यांचा आदर्श निर्माण केला. स्वराज्यसंकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांची दूरदृष्टी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे राष्ट्रनिर्मितीचे संस्कार, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोकाभिमुख नेतृत्व आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हिंदवी स्वराज्यासाठीचा अद्वितीय त्याग हीच या परिवाराच्या विचारांची प्रेरणास्थाने आहेत.

आजचा समाज अनेक सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक आव्हानांना सामोरा जात आहे. महिला सुरक्षा व सक्षमीकरण, युवकांचे नेतृत्व व कौशल्य विकास, शेतकरी कल्याण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य सेवा, पर्यावरण संरक्षण, दुर्गसंवर्धन, इतिहास संशोधन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे जतन, सामाजिक समता आणि राष्ट्रहिताच्या विविध क्षेत्रांत संघटित लोकसहभागाची आवश्यकता पूर्वीपेक्षा अधिक आहे.

याच सामाजिक गरजेतून "शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान" या परिवाराची संकल्पना साकार झाली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला सेवा, संस्कार, संघटन, शिस्त, उत्तरदायित्व, स्वावलंबन आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांशी जोडून लोकसहभागाच्या माध्यमातून सक्षम, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्राभिमानी समाज घडविणे, हीच या परिवाराची मूलभूत संकल्पना आहे.

हा परिवार कोणत्याही जात, पंथ, भाषा, प्रदेश किंवा सामाजिक स्तराच्या मर्यादेत न राहता भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा आदर राखत राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, लोककल्याण आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान हा प्रत्येक स्वयंसेवकाला आपल्या कुटुंबातील सदस्य मानणारा परिवार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान, न्याय आणि विकासाची समान संधी मिळावी, सेवा हीच सर्वोच्च साधना आणि राष्ट्रहित हेच सर्वोच्च कर्तव्य या भावनेने प्रेरित स्वयंसेवकांचे सशक्त व संस्कारित परिवार उभारणे, हा या संस्थेचा मूलाधार आहे.

"हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून देव, देश , धर्म, सेवा, संस्कार, संघटन आणि राष्ट्रनिर्मिती." हा विचारच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान परिवाराच्या प्रत्येक उपक्रमामागील प्रेरणास्रोत असून, जनसहभागाच्या बळावर सशक्त, समृद्ध, संस्कारित आणि राष्ट्रनिष्ठ भारत घडविण्याचा हा एक प्रामाणिक सामाजिक संकल्प आहे.

Meet Our Team
About
हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणेतून उज्ज्वल उद्याची वाटचाल

आमची दुरदृष्टी

हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन तत्त्वांचा वारसा जपत न्याय, स्वाभिमान, स्वावलंबन, सुशासन, लोककल्याण आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांवर आधारित सशक्त, समृद्ध, संस्कारित आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती करणे; जिथे प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुलभ आरोग्यसेवा, सुरक्षित व सन्मानपूर्ण जीवन, समान संधी आणि सर्वांगीण विकासाचा अधिकार प्राप्त असेल, अशी लोकाभिमुख, मूल्याधिष्ठित आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च मानणारी समाजव्यवस्था घडविणे, हीच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानची सर्वोच्च दूरदृष्टी आहे.

"Swarajya and Social Equality for All Citizens."

Education

Free Study Kits & Mentoring

Healthcare

Blood Camps & Health Aid

Women Power

Self-Defence & SHGs

Heritage Forts

Conservation & Cleanup
सेवा हीच साधना, राष्ट्रसेवा हीच आराधना

आमचे ध्येय

शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य सेवा, महिला सुरक्षा व सक्षमीकरण, शेतकरी कल्याण, पर्यावरण संवर्धन, दुर्गसंवर्धन, इतिहास संशोधन, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जतन आणि जनकल्याणाच्या विविध क्षेत्रांत लोकसहभागावर आधारित प्रभावी उपक्रम राबवून समाजाचे सर्वांगीण सक्षमीकरण करणे, हेच आमचे ध्येय आहे. हिंदवी स्वराज्याच्या लोककल्याणकारी तत्त्वांचा वारसा जपत, सेवा, संस्कार, संघटन आणि राष्ट्रनिष्ठ नागरिकशक्तीच्या बळावर ग्रामीण ते शहरी भागापर्यंत समाजहित, राष्ट्रहित आणि मानवसेवेची अखंड चळवळ उभारणे, तसेच पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख शिवशाहीतील न्याय, सुशासन आणि लोकसेवेचे मूल्य प्रत्येक कृतीतून जिवंत ठेवणे, हीच शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानची कार्यप्रतिज्ञा आहे.

  • 24/7 Emergency Blood Donor Help-Desk
  • Fort Preservation & Tree Plantation Campaign
  • Youth Leadership & Skill Development Workshops

Join Hands for Social Duty

Become an active member or volunteer in your district today.

Register as Volunteer

Rashtradharma (Nation First)

Placing national integrity and public service above all individual interests.

Nishkam Seva (Selfless Service)

Helping every needy family without expectation, discrimination, or bias.

Heritage Honor

Preserving Maratha fort monuments and historical pride for future generations.

स्थापना

हिंदवी स्वराज्यसंकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या दूरदृष्टीला, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या संस्कारांना, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी शिवशाहीला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अदम्य स्वराज्यनिष्ठा, धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठ त्यागाला अखंड प्रेरणास्रोत मानून, राष्ट्रसेवा, समाजसेवा, लोककल्याण, इतिहाससंवर्धन, सांस्कृतिक वारसा जतन, पर्यावरण संरक्षण, जनजागृती आणि संघटित समाजपरिवर्तनाचा पवित्र संकल्प साकार करण्याच्या उद्देशाने "शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान" या संस्थेची स्थापना मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शालिवाहन शके १९४६ (आग्लं दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२२) रोजी करण्यात आली.

2015 — Foundation Year

Inauguration in Sadashiv Peth, Pune with 25 passionate founding volunteers.

2018 — State-Level Expansion

Expanded operations across 8 Western Maharashtra districts with 5,000+ members.

2022 — 10,000 Members Milestone

Crossed 10,000 registered volunteers and executed 100+ fort restoration campaigns.

2026 — Present Era

12,500+ active members across 18 districts, touching over 85,000 lives.

Interactive Action Hub

Take the Shivsevak Community Pledge

Select how you want to contribute today. Click any action below to pledge your support live!

Plant Fort Sapling

Pledge to plant and care for 1 tree seedling during fort cleanup drives.

3,420 Pledged

Donate Emergency Blood

Register your contact in our district emergency donor list.

1,890 Pledged

Pledge 2 Hours / Month

Volunteer 2 hours every month for local community drives.

4,150 Pledged

Sponsor Student Kit

Provide notebooks & stationery to 1 rural school student.

2,780 Pledged
Thank you! Your pledge has been recorded for Shivsevak Pratishthan.