🚩 Announcements: Join the Blood Donation Drive on August 15th at Sadashiv Peth Office. Register online as a member now! 🚩 Click Here
Home Menu Register Call
PROGRAM DETAILS

शेतकरी

""शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा''

Home / Programs / शेतकरी
शेतकरी
OVERVIEW & OBJECTIVES

About This Welfare Initiative

पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्याला म्हणतात की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका नाही तर तुमचे हात गरम केले जातील. कारण कोणत्याही राज्याचा गाडा त्या राज्याच्या शेतीच्या चाकावर चालत असतो. वास्तविक शिवकालीन गाड्यापासून शिवकालीन कृषी व्यवस्था बाजूला काढता येणार नाही. कारण कृषी व्यवस्था त्या गाड्याचे एक अविभाज्य अंग होते. "शेतकरी सुखी, रयत सुखी तर राजा सुखी' हे शिवाजी महाराज यांच्या राज्य कारभाराचे प्रधान सूत्र होते. हे हिंदवी स्वराज्य शेतकऱ्यांच्या, रयतेच्या कल्याणासाठी आहे, ही त्यांची भावना, त्यांच्या अनेक आज्ञापत्रातून व्यक्त झालेली आहे. म्हणूनच त्यांचे वर्णन अनेक इतिहासकारांनी ""शेतकऱ्यांचा राजा, रयतेचा राजा'' असे केलेले आहे.

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या समोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत. खतांचे व बियाणांचे भाव, पीक विमा, कृषी कर्ज अशा अनेक बाबतींत शेतकरी मनातल्या मनात पिचला जात आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकट तर नेहमीच असते, मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात देखील शासन – प्रशासन आश्वासन देऊन नैराश्य दाखवते. श्री शिवछत्रपतींच्या शेती व्यवस्थापनाची प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांचे जीवन सुखी समृद्ध व्हावे, याकरिता शासन – प्रशासनाला योग्य पद्धतीने योजना राबविण्यास व शेतकरी वर्गास न्याय देण्यास शिवसेवकांची ताकद भाग पाडेल.
Verified Community Impact
Thousands of lives touched across 36 districts
Targeted Execution

Programs are executed at the grassroots level by verified District Coordinators across Maharashtra.

80G Tax Deductible

All financial contributions for this program receive instant 80G tax exemption certificates.

Volunteer Driven

Powered by 12,000+ dedicated volunteers working with zero administrative overhead.